डाळींब

इमेज
 🍎 डाळिंब (Pomegranate) चे औषधी गुण डाळिंब हे अत्यंत पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. ✅ औषधी व आरोग्यदायी फायदे रक्तवाढीस मदत – लोह (Iron) व इतर पोषक घटकांमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – व्हिटॅमिन C भरपूर असते. हृदयासाठी चांगले – अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पचन सुधारते – तंतुमय पदार्थ (Fiber) असल्याने पचनक्रिया चांगली राहते. अशक्तपणा कमी करण्यास मदत – नियमित सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. त्वचेसाठी फायदेशीर – त्वचेचे आरोग्य टिकवण्यास मदत करते. दाह कमी करण्यास मदत – डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. 🌿 आयुर्वेदिक उपयोग डाळिंबाची साल अतिसार व पोटाच्या काही तक्रारींमध्ये पारंपरिकरित्या वापरली जाते. डाळिंबाचा रस अशक्तपणा व थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. ⚠️ खबरदारी डाळिंब आरोग्यासाठी चांगले असले तरी संतुलित प्रमाणात सेवन करावे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रसाऐवजी संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले.डाळींब डाळिंब हे **औषधी गुणधर्म असलेले फळ** आहे. त्याचे दाणे, रस, साल आणि फुले पारं...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘अॅग्रोटेक–२०२५’ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन




डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘अॅग्रोटेक–२०२५’ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन

अकोला :

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ‘अॅग्रोटेक–२०२५’ या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २७ डिसेंबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत विद्यापीठ क्रीडांगण, नागपूर रोड, अकोला येथे होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग तसेच आत्मा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी नविन संशोधन, आधुनिक शेती पद्धती, कृषी अवजारे, तंत्रज्ञान व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

या कृषी प्रदर्शनात विद्यापीठ व संलग्न कृषी संस्थांचे दालने, कृषी विभागाची दालने, मत्स्यव्यवसाय विकास विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग, कृषी व ग्रामीण उद्योग दालने, बचत गटांचा सहभाग तसेच फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच कृषी औजारे व उत्पादनांची दालने, ग्रामीण व्यवसाय उत्पादने, विद्यापीठ प्रकाशने आणि शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन सत्रेही आयोजित केली जाणार आहेत.

शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व आधुनिक, शाश्वत आणि उत्पन्नवाढीच्या शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बिजोत्पादनात घ्यावयाची काळजी व बिजोत्पादन मानके .

साप चावणे समजून घेणे आणि प्रतिसाद देणे

जांभूळ

माती परीक्षण आणि महत्व .

गोड नीम

16 पोषक घटकाची वर्गवारी आणि महत्व .

रासायनिक खते .खत व्यवस्थापण कसे करावे .

कोरफड

शेतकऱ्यांना रोजच्या कामात येणारे मापे वजने परिमाणं