बिजोत्पादनात घ्यावयाची काळजी व बिजोत्पादन मानके .
आता जवळपास पावसाला संपून सार्वजन पुढच्या पिकाची मंजेच रब्बी पिकाची पेरणीच्या तयारीला लागण्याच्या तयारीत आहेत .त्याचाच एक भाग गजो पेरणीच्या दृष्टीने महत्वाचा आहे .तो म्हंजे बियाणे .
कोणताही जातीची उत्पादनक्षमता हि त्यामध्ये असलेल्या अनुवंशिक गुणावर अवलंबून असते .त्यामुळे उत्पादन क्षमता पिढ्यानपिढ्या टिकून ठेवायची असेल तर त्यामध्ये बिजोत्पाधन करताना कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये .याची दक्षेता घ्यावी लागते .शंभर टक्के शुद्ध बियाणे तयार करण्यासाठी बिजोत्पादन तयार करताना पुढील काळजी घ्यावी लागते .
१ ] पेरणी साठी बियाणे : बीजोत्पादनासाठी योग्ये त्या प्रकारचे बियाणे म्हणजेच पायाभूत बीजोत्पादनासाठी मुलभूत तर प्रमाणित बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावीत बियाणे खरेदी करताना ,बियाणे खरेदीची पावती घ्यावी .
२] क्षेत्राची निवड : बीजोत्पादनासाठी क्षेत्राची निवड करताना ज्या पिकाचे बिजोत्पादन घ्यायचे आहे ते पिक मागील हंगामात घेतलेले नसावे .निवड केलेले पिक मागील हंगामात घेतलेले असल्यास त्या क्षेत्रास पेरणीपूर्वी पाणी देऊन त्यामध्ये असलेले बी उगवून आल्यानंतर त्या संपूर्ण क्षेत्राची नांगरणी वखरणी करून उगवलेले बियाणे नाहीसे करावे .निवडलेली जमीन सुपीक सपाट व पाण्याचा निचरा होणारी असावी .व त्यास ओलिताची सोय असावी .
3 ]विलगीकरण अंतर : बिजोत्पादन घेण्यात आलेल्या जातीमध्ये त्याच पिकाच्या इतर जातीपासून परागीभवन होवून भेसळ होऊ नये म्हणून विविध पिकासाठी विलगीकरण अंतर ठरवून दिलेल्या विलगीकरण अंतराद्वारा पिक वेगळे ठेवावे .दोन पिकात काही अंतर ठेवावे .
४ ] पेरणी : बीजोत्पादनासाठी निवडलेले बियाणे हे अधिकृत प्रमाणित केलेले असावे .त्याचप्रमाणे पेरणी योग्य अंतरावर व वेळेत पूर्ण करावी .
५ ] भेसळ काढणे : शुद्ध व दर्जेदार बिजोत्पादन करण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रात आढळून येणारी भेसळ वेळेच्या वेळी काढून टाकावी .याकरिता पिक वाढीच्या अवस्थेत वेळोवेळी बिजोत्पादन क्षेत्राची निरीक्षेने घ्यावीत.स्वपरागीकरण असणाऱ्या पिकात भेसळीची झाडे म्हणजेच जातीच्या गुणधर्म व्येतीरेक्त इतर गुणधर्माची झाडे पिक काढण्या पूर्वी काढली तरी चालतात .भेसळ व्यतिरिक्त बियाणे मार्फत होणारे रोग व तणाचा प्रसार टाळण्यासाठी काही आक्षेपार्ह रोग व तण ठरवण्यात आले आहेत .अशी रोग व तणाची झाडे वेळच्यावेळी काढून टाकावेत .
6 ] काढणी व मळणी : पिकाची कापणी योग्य वेळी करावी संकरीत बिजोत्पादनमध्ये नर व कणसाची काढणी अगोदर करून ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे .मळणी करते वेळी अवजारे स्वच्छ असावी . त्यामुळे भेसळ टाळता येईल .काढणी व मळणी झाल्यानंतर बियाणे प्रक्रिया होईपर्यंत व प्रक्रिया झाल्या नंतर विक्री पर्यंत साठवले जाते .साठवण्या पूर्वी बियाणे सुरक्षित ओलाव्यापर्यंत ठेवणे अत्यंत गरजेचे असते .
वारील सर्व बाबी योग्य खबर दरी घेऊन उत्तम व दर्जेदार बियाणे तयार होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन वाढेल आणि बियाण्याची गुणवत कायम राहील बी सुरक्षित राहील .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा