डाळींब

इमेज
 🍎 डाळिंब (Pomegranate) चे औषधी गुण डाळिंब हे अत्यंत पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. ✅ औषधी व आरोग्यदायी फायदे रक्तवाढीस मदत – लोह (Iron) व इतर पोषक घटकांमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – व्हिटॅमिन C भरपूर असते. हृदयासाठी चांगले – अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पचन सुधारते – तंतुमय पदार्थ (Fiber) असल्याने पचनक्रिया चांगली राहते. अशक्तपणा कमी करण्यास मदत – नियमित सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. त्वचेसाठी फायदेशीर – त्वचेचे आरोग्य टिकवण्यास मदत करते. दाह कमी करण्यास मदत – डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. 🌿 आयुर्वेदिक उपयोग डाळिंबाची साल अतिसार व पोटाच्या काही तक्रारींमध्ये पारंपरिकरित्या वापरली जाते. डाळिंबाचा रस अशक्तपणा व थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. ⚠️ खबरदारी डाळिंब आरोग्यासाठी चांगले असले तरी संतुलित प्रमाणात सेवन करावे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रसाऐवजी संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले.डाळींब डाळिंब हे **औषधी गुणधर्म असलेले फळ** आहे. त्याचे दाणे, रस, साल आणि फुले पारं...

16 पोषक घटकाची वर्गवारी आणि महत्व .



नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण सूक्ष्म पोषक घटका बद्दल माहिती घेणार आहोत. काही दिवसापूर्वी आपण नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK)  बद्दल माहिती घेतली होती. ज्याप्रमाणे नत्र, स्फुरद आणि पालाश यांची आपल्या पिकांना गरज असते त्याच प्रमाणे सूक्ष्म पोषक घटक पिकांना गरजेचे असतात.  सूक्ष्म पोषक घटक संतुलित पिक पोषण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावतात. पण या पोषक घटकांची गरज खूप कमी प्रमाणात असते म्हणून त्याला सूक्ष्म पोषक घटक असे म्हणतात.

पिकांमध्ये फुलधारणा, फळधारणा रोगप्रतिकारकशक्ती यासारख्या कार्यांमध्ये सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. त्यासाठी पीक लागवडीच्या आधी माती परीक्षण केल्यास आपणास आपल्या शेतात कोणत्या घटकाची कमतरता आहे हे लक्षात येईल आणि त्या प्रमाणे आपण सूक्ष्म पोषक घटकाचा वापर आपल्या शेतात योग्य प्रकारे करू शकतो. सर्वसाधारणपणे पानाच्या रंगावरून सूक्ष्म पोषक घटकाची कमतरता ओळखता येते.

एकंदरीत जर पहिलं तर १६ पोषक घटक असतात. त्यामध्ये १३ अन्नद्रव्य जमिनीतून घेतली जातात. तर ३ हवा आणि पाण्यातून मिळतात. नेहमी आपण जो आपल्या पिकांना खतांचा पुरवठा करतो त्यातून नत्र, स्फुरद, आणि पालाश त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक मिळत असतात. खाली दिल्या प्रमाणे १६ पोषक घटकांची वर्गवारी करण्यात अली आहे.

  • हवा आणि पाण्याद्वारे मिळणारे घटक : कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन
  • महत्वाचे पोषक: नायट्रोजन(N), फॉस्फोरस(P), पोटॅशियम(K) [याची माहिती आपण काही दिवसांपूर्वी घेतली आहे ]
  • माध्यमिक पोषक: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर
  • सूक्ष्मपोषक: बोरॉन (boron - B), क्लोरीन (chlorine - Cl), तांबे (copper - Cu), लोहा (iron - Fe), मॅगनीज (manganese - Mn), मोलिबडेनम (molybdenum  - Mo) आणि जस्त (zinc - Zn).



बोरॉन (boron - B): बोरॉन हे पिकांमध्ये कोशिका विभाजनाचे (cell division) कार्य करतात. या पृथ्वीवरील कोणत्याही सजीवाची वाढ होत असताना त्याच्या कोशिकाचे  विभाजन होत असते. कोशिका विभाजनामध्ये व्यतेय आला तर पिकांची योग्यप्रकारे वाढ होत नाही. बोरॉनच्या कमतरता हि कोंबांच्या वाढीमध्ये फूल आणि फळामध्ये दिसून येते.

क्लोरीन (chlorine - Cl): क्लोरीन मुळे प्रकाशसंस्लेषणक्रिया सुधारते. क्लोरीनचा योग्य वापर केल्यास धान्य पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पालाश Potassium (K) आणि क्लोरीन एकत्रित प्रकाशसंस्लेशन क्रिया योग्यरीत्या कार्यरत ठेवतात.तसेच पिकांच्या अंतर्गत पाणी व्यवस्थापनामध्ये पालाश आणि क्लोरीन महत्वाची भूमिका पार पडतात.



तांबे (copper - Cu):  तांबे प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक भूमिका पार पाडत असते.  पिकांच्या श्वसन प्रक्रियेसाठी आवश्यक असते. पिकांच्या फळाची चव, रंग आणि फुलाचा रंग हा योग्य प्रमाणात copper असल्यास उत्तम होतो. तांबे स्थिर आहे. म्हणजेच त्याच्या कमतरतेची लक्षणे नवीन पानांमधे उद्भवतात.नवीन येणारी पाने लहान येतात आणि पानांना तेज नसतो.

लोहा (iron - Fe): लोह हा घटक अत्यंत महत्वाचा घटक आहे. क्लोरोफिल(हरित द्रव्य) मुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो.वनस्पती  लोह शिवाय क्लोरोफिल तयार करू शकत नाहीत. शिवाय, त्या ऑक्सिजन पण घेऊ शकत नाहीत. म्हणून लोह हा घटक पानांचा हिरवा रंग कायम ठेवण्यास मदत करतो.


मॅगनीज (manganese - Mn): प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छ्वास, आणि नायट्रोजन योग्य पद्धतीने ग्रहण करणे यासारख्या विविध कार्यासाठी  वनस्पतींमध्ये मँगनिजचा वापर केला जातो. मँगेनजमुळे  पराग उगवण, परागनलिकामध्ये वाढ होते आणि रोगजनकांच्या प्रतिकारशक्तीशी मध्ये वाढ होते.मॅगनीजच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ खुंटते आणि पिके आहे त्याच स्थितिमध्ये राहतात.  

मोलिबडेनम (molybdenum  - Mo): पिकामध्ये असलेले नायट्रेट किंवा मातीतून घेतलेले नत्र प्रोटीन मध्ये रुपांतरीत करण्यासाठी मोलिबडेनम चा उपयोग होतो. मोलिबडेनम योग्य प्रमाणात ना मिळाल्यास नत्राची कमतरता असलेली लक्षणे दिसून येतात. आणि त्यामुळेच नायट्रेट न वापरता संचय झाल्याने पानांची कडा कारपल्यासारख्या दिसतात.

जस्त (Zn): हे आठ आवश्यक पोषक घटकांमधील एक आहे. वनस्पतींसाठी कमी प्रमाणामध्ये हे आवश्यक असले तरी रोपांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. जस्त  हे झाडांमधील अनेक एंझाइम्स आणि प्रथिने यामधील एक मुख्य घटक आहे. जस्त हे विशिष्ट प्रथिनांच्या संश्लेषणासाठी जबाबदार असलेल्या एन्झाइम ला  सक्रिय करतात. हे क्लोरोफिल आणि काही कार्बोहायड्रेट निर्मिती, स्टार्च चे साखरेत रूपांतर करणे, वनस्पतींच्या ऊतीमध्ये थंड तापमान रोखण्यात मदत करते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बिजोत्पादनात घ्यावयाची काळजी व बिजोत्पादन मानके .

साप चावणे समजून घेणे आणि प्रतिसाद देणे

जांभूळ

माती परीक्षण आणि महत्व .

गोड नीम

रासायनिक खते .खत व्यवस्थापण कसे करावे .

कोरफड

शेतकऱ्यांना रोजच्या कामात येणारे मापे वजने परिमाणं