पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🌾 शिवार फेरी २०२६ | शेतकऱ्यांसाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष भेट! डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या वतीने २० ते २२ सप्टेंबर २०२६

इमेज
  🌾 शिवार फेरी २०२६ | शेतकऱ्यांसाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष भेट! डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या वतीने २० ते २२ सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसीय खरीप शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे. 🔎 शिवार फेरीत काय पाहायला मिळणार? 🌱 ११० खरीप पिके 🥬 २७ भाजीपाला पिके 🌺 ६५ फुलपिके 🌾 विविध पिकांच्या २२८ वाण व तंत्रज्ञान प्रात्यक्षिके 🚜 १५ लागवड तंत्रज्ञान शिफारशी 👨‍🔬 कृषी शास्त्रज्ञांशी थेट संवाद 🔬 विद्यापीठाच्या संशोधन व प्रात्यक्षिक क्षेत्रांची पाहणी 🌱 रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीची सुरुवात 📍 स्थळ: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 📅 वाशीम, अकोला, बुलढाणा व गोंदिया जिल्ह्यांसाठी: २० सप्टेंबर २०२६ ⏰ उद्घाटन : २० सप्टेंबर, सकाळी ११ वाजता 🎯 शिवार फेरीचा उद्देश: विद्यापीठाने विकसित केलेले पीक वाण, संशोधन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहता यावे आणि आपल्या शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. 🌾 पाहा • शिका • प्रयोग करा • शेती समृद्ध करा! 📲 ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. #शिवा...

नागरिकांनो ! विजा चमकत असल्यास खबरदारी घ्या

इमेज
विजेपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये  पावसामध्ये विजेपासून स्वतःला वाचवायचे असेल तरअशा पद्धतीने घ्या काळजी! विजा चमकत असताना टाळा या गोष्टी जेव्हा जून महिन्याचा म्हणजेच मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस असतो त्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट होताना आपल्याला दिसून येतो. अगदी त्याच पद्धतीने अवकाळी पावसाचे जेव्हा परिस्थिती उद्भवते त्यावेळी मात्र वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि प्रचंड प्रमाणात विजांचा कडकडाट होत असतो व अशाप्रसंगी बऱ्याचदा वीज पडण्याच्या घटना घडतात व यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते.       अवकाळी पाऊस होत असून अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी विजा पडून जनावरे आणि माणसे देखील मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडताना दिसून येत आहेत. अशा प्रसंगी खास करून शेतकरी बंधूंनी जेव्हा आकाशात विजा कडाडत असतील तर त्यावेळी योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःला वाचवणे खूप गरजेचे असते. या अनुषंगाने या लेखात आपण आकाशात विजा चमकत असताना कोणती खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती...