बिजोत्पादनात घ्यावयाची काळजी व बिजोत्पादन मानके .

इमेज
 आता जवळपास पावसाला संपून सार्वजन पुढच्या पिकाची मंजेच रब्बी पिकाची पेरणीच्या तयारीला लागण्याच्या तयारीत आहेत .त्याचाच एक भाग गजो पेरणीच्या दृष्टीने महत्वाचा आहे .तो म्हंजे बियाणे . कोणताही जातीची उत्पादनक्षमता हि त्यामध्ये असलेल्या अनुवंशिक गुणावर अवलंबून असते .त्यामुळे उत्पादन क्षमता पिढ्यानपिढ्या टिकून ठेवायची असेल तर त्यामध्ये बिजोत्पाधन करताना कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये .याची दक्षेता घ्यावी लागते .शंभर टक्के शुद्ध बियाणे तयार करण्यासाठी बिजोत्पादन तयार करताना पुढील काळजी घ्यावी लागते . १ ] पेरणी साठी बियाणे : बीजोत्पादनासाठी योग्ये त्या प्रकारचे बियाणे म्हणजेच पायाभूत बीजोत्पादनासाठी मुलभूत        तर प्रमाणित बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावीत बियाणे खरेदी करताना ,बियाणे खरेदीची पावती             घ्यावी    . २] क्षेत्राची निवड : बीजोत्पादनासाठी क्षेत्राची निवड करताना ज्या पिकाचे बिजोत्पादन घ्यायचे आहे ते पिक मागील हंगामात घेतलेले नसावे .निवड केलेले पिक मागील हंगामात घेतलेले असल्यास त्या क्षेत्...

रासायनिक खते .खत व्यवस्थापण कसे करावे .

 पिकाच्या दृष्टीने एकूण १६ अन्नद्रव्याची आवशकता असते .त्या अनाद्रव्यांची विभागणी पुढील प्रमाणे केली जाते.

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आपण आपल्या शेतीशी निघडीत दैनंदिन कामात NPK (नत्र, स्फुरद आणि पालाश) चा उल्लेख करत असतो. त्याच बरोबर त्याचा वापर हि करत असतो. आज आपण त्याच नत्र स्फुरद आणि पालाश बद्दल येथे थोडक्यात माहिती घेणार आहोत.


NPK  म्हणजे काय?
Nitrogen (N) Phosphorus (P)  Potassium (K). नैट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशिअम. NPK हि त्यांची शास्त्रीय नावे आहेत. NPK हे महत्वाचे पोषक घटकं असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारे हि ते देत असतो. हे घटक इतके महत्वाचे असतात कि याविना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही. NPK मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो. ती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.

नत्र  Nitrogen (N):
नत्र हे पिकाच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात. म्हणजेच नत्र दिल्याने पिकांची पानांची वाढ चांगली होते पाने हिरवी गार राहतात. ज्याप्रमाणे प्रथिने (proteins) मानवाच्या शरीराला उपयोगी असतात त्याच प्रमाणे पिकांना हि त्याची गरज असते. ती प्रथिने नत्रा मधून मिळत असतात. जर पिकांची पाने  पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असेल समजावे लागेल. पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग होत असतो.

स्फुरद Phosphorus (P) :
स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याच बरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचं असतो. पिकाच्या प्रजनन चक्रामध्ये स्फुरद अत्यंत गरजेचं असत. स्फुरद मुळे प्रकाश संश्लेषण क्रिया उत्तम प्रकारे होत असते आणि यामुळेच पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम चांगल्या प्रकारे करत असतात. नत्र प्रमाणेच स्फुरद पण पेशी विभाजनाचे काम करत असते.
 
पालाश Potassium (K)
 पिकांच्या पानामध्ये छोटे-छोटे छिद्र असतात हि छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघड - बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम करत असतात. पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास हि छोटी छिद्र योग्य प्रकारे उघड-बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते. या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य पालाश करत असते. उदा. ऊसाच्या पानांमधून तयार झालेले अन्न उसाच्या पेरा मध्ये रूपांतरित होते. पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनत असतात. पालाशमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते.  

मित्रांनो, ही होती नत्र, स्फुरद आणि पालाश ची थोडक्यात माहिती. आता पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत मी Micro-nutrients सूक्ष्म पोषक घटक आणि त्याचे कार्य. धन्यवाद.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साप चावणे समजून घेणे आणि प्रतिसाद देणे

बिजोत्पादनात घ्यावयाची काळजी व बिजोत्पादन मानके .

माती परीक्षण आणि महत्व .

16 पोषक घटकाची वर्गवारी आणि महत्व .

आज सर्वात मोठी पर्यावरणीय समस्या म्हणजे ग्लोबल वार्मिंग

शेतकऱ्यांना रोजच्या कामात येणारे मापे वजने परिमाणं

जमीन/माती संबंधित समस्या मातीचा ऱ्हास

नागरिकांनो ! विजा चमकत असल्यास खबरदारी घ्या