पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिजोत्पादनात घ्यावयाची काळजी व बिजोत्पादन मानके .

इमेज
 आता जवळपास पावसाला संपून सार्वजन पुढच्या पिकाची मंजेच रब्बी पिकाची पेरणीच्या तयारीला लागण्याच्या तयारीत आहेत .त्याचाच एक भाग गजो पेरणीच्या दृष्टीने महत्वाचा आहे .तो म्हंजे बियाणे . कोणताही जातीची उत्पादनक्षमता हि त्यामध्ये असलेल्या अनुवंशिक गुणावर अवलंबून असते .त्यामुळे उत्पादन क्षमता पिढ्यानपिढ्या टिकून ठेवायची असेल तर त्यामध्ये बिजोत्पाधन करताना कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये .याची दक्षेता घ्यावी लागते .शंभर टक्के शुद्ध बियाणे तयार करण्यासाठी बिजोत्पादन तयार करताना पुढील काळजी घ्यावी लागते . १ ] पेरणी साठी बियाणे : बीजोत्पादनासाठी योग्ये त्या प्रकारचे बियाणे म्हणजेच पायाभूत बीजोत्पादनासाठी मुलभूत        तर प्रमाणित बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावीत बियाणे खरेदी करताना ,बियाणे खरेदीची पावती             घ्यावी    . २] क्षेत्राची निवड : बीजोत्पादनासाठी क्षेत्राची निवड करताना ज्या पिकाचे बिजोत्पादन घ्यायचे आहे ते पिक मागील हंगामात घेतलेले नसावे .निवड केलेले पिक मागील हंगामात घेतलेले असल्यास त्या क्षेत्...

माती परीक्षण आणि महत्व .

       नमस्कार मंडळी, आज आपण माती परीक्षण या विषयावर चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांना माहित आहेच कि माती परीक्षण हि काळाची गरज झाली आहे.  जवळ जवळ ६०% उत्पन्न हे मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. कोणत्याही ऋतू मधली पिकं ही मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असतात. तुम्ही मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केलात तरी शेतीचे उत्पन्न वाढवणे खूप कठीण आहे. शेतामध्ये चांगले पीक आणण्यासाठी सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. हे आपण एका लेखात पहिले आहे. शेतीतील एक नियम असा सागतो  कि तुम्ही तुमच्या पिकाला सगळे सूक्ष्म पोषक घटक दिले आणि त्यातील एक घटक जरी थोडा कमी झाला तरी देखील एकूण उत्पन्नात खूप घट होत असते.               एकाच पिकासाठी आवश्यक असलेली खताची मात्रा आणि प्रकार हे शेत व एकाच शेतातील माती ह्या नुसार बदलू शकते. शेताची सुपीकता वाढविण्यासाठी योग्य खताचा प्रकार व त्याची मात्रा निश्चित करणे गरजेचे असते. माती परीक्षण विना अयोग्य प्रकारची व अयोग्य प्रमाणात खत दिल्यास पिकांचे फार मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. त्...

16 पोषक घटकाची वर्गवारी आणि महत्व .

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सूक्ष्म पोषक घटका बद्दल माहिती घेणार आहोत. काही दिवसापूर्वी आपण नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK)  बद्दल माहिती घेतली होती. ज्याप्रमाणे नत्र, स्फुरद आणि पालाश यांची आपल्या पिकांना गरज असते त्याच प्रमाणे सूक्ष्म पोषक घटक पिकांना गरजेचे असतात.  सूक्ष्म पोषक घटक संतुलित पिक पोषण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावतात. पण या पोषक घटकांची गरज खूप कमी प्रमाणात असते म्हणून त्याला सूक्ष्म पोषक घटक असे म्हणतात. पिकांमध्ये फुलधारणा, फळधारणा रोगप्रतिकारकशक्ती यासारख्या कार्यांमध्ये सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. त्यासाठी पीक लागवडीच्या आधी माती परीक्षण केल्यास आपणास आपल्या शेतात कोणत्या घटकाची कमतरता आहे हे लक्षात येईल आणि त्या प्रमाणे आपण सूक्ष्म पोषक घटकाचा वापर आपल्या शेतात योग्य प्रकारे करू शकतो. सर्वसाधारणपणे पानाच्या रंगावरून सूक्ष्म पोषक घटकाची कमतरता ओळखता येते. एकंदरीत जर पहिलं तर १६ पोषक घटक असतात. त्यामध्ये १३ अन्नद्रव्य जमिनीतून घेतली जातात. तर ३ हवा आणि पाण्यातून मिळतात. नेहमी आपण जो आपल्या पिकांना खतांचा पुरवठा करतो त्यातून नत्र, स्फुरद, आणि पालाश त्य...

रासायनिक खते .खत व्यवस्थापण कसे करावे .

  पिकाच्या दृष्टीने एकूण १६ अन्नद्रव्याची आवशकता असते .त्या अनाद्रव्यांची विभागणी पुढील प्रमाणे केली जाते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतीशी निघडीत दैनंदिन कामात NPK (नत्र, स्फुरद आणि पालाश) चा उल्लेख करत असतो. त्याच बरोबर त्याचा वापर हि करत असतो. आज आपण त्याच नत्र स्फुरद आणि पालाश बद्दल येथे थोडक्यात माहिती घेणार आहोत. NPK  म्हणजे काय? Nitrogen (N) Phosphorus (P)  Potassium (K). नैट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशिअम. NPK हि त्यांची शास्त्रीय नावे आहेत. NPK हे महत्वाचे पोषक घटकं असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारे हि ते देत असतो. हे घटक इतके महत्वाचे असतात कि याविना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही. NPK मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो. ती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत. नत्र  Nitrogen (N): नत्र हे पिकाच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात. म्हणजेच नत्र दिल्याने पिकांची पानांची वाढ चांगली होते पाने हिरवी गार राहतात. ज्याप्रमाणे प्रथिने (proteins) मानवाच्या शरीराला उपयोगी ...

कृषिक्षेत्र!

इमेज